रॅपिडो बाईक टॅक्सींमुळे उत्पन्नावर परिणाम; ठाण्यातील रिक्षाचालकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

रॅपिडो बाईक टॅक्सींमुळे उत्पन्नावर परिणाम; ठाण्यातील रिक्षाचालकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याचा दावा करणाऱ्या ठाण्यातील रिक्षा चालकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. अॅप आधारित या टॅक्सीमुळे तुमच्या मूलभूत अधिकारांवर कसा काय परिणाम होईल, असा सवाल करत न्यायालयाने याचिकाकर्त्या रिक्षा चालकांना याप्रकरणी जाब विचारला. इतकेच नव्हे तर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली.

अॅप आधारित रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा करत ठाण्यातील रिक्षा चालक अमरजित गुप्ता व अन्य काही जणांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, कायद्यानुसार, प्रादेशिक परिवहन कार्यालयात व्यावसायिक वाहने म्हणून नोंदणीकृत आणि पिवळ्या नंबर प्लेट असलेली वाहनेच टॅक्सी म्हणून चालवण्याची परवानगी आहे. असे असताना जेव्हा याचिकाकर्त्यांनी रॅपिडो ऑप्लिकेशनद्वारे राईड्स बुक केल्या तेव्हा ज्या बाईक दिसल्या त्या पांढऱ्या नंबर प्लेटच्या होत्या ती वाहने खासगी, गैर-वाहतूक वाहने होती.

न्यायालय काय म्हणाले?

  • उद्या तुम्ही म्हणाल टॅक्सी चालवू नका, मेट्रो चालवू नका.
  • अॅप आधारित बाईक टॅक्सीचा तुमच्या उपजीविकेवर कसा काय परिणाम होईल?
  • तुमच्या मूलभूत अधिकारावर अजिबात परिणाम होत नाही. दरवर्षी टॅक्सी बाजारात येतात. यात बेकायदेशीरपणा आढळल्यास सरकार त्यावर निर्णय घेईल.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;