सुशांत सोबत काम करण्याचे अंकिता लोखंडेला मिळायचे एवढे पैसे, मोठं सत्य समोर

सुशांत सोबत काम करण्याचे अंकिता लोखंडेला मिळायचे एवढे पैसे, मोठं सत्य समोर

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला अनेक वर्षे उलटली आहेत. तरी देखील अभिनेत्याला चाहते विसरु शकलेले नाहीत. कोणत्याही महत्त्वाच्या क्षण अभिनेत्याच्या आठवणी ताज्या होतात. सुशांत याच्यासोबत स्क्रिन शेअर करत प्रसिद्धी झोतात आलेली अंकिता लोखंडे देखील अभिनेत्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट देखील केलं. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे दोघांमध्ये असलेलं नातं आणखी घट्ट झालं. सांगायचं झालं तर, मालिकेमुळे अंकिता आणि सुशांत याच्या करियरची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पण तुम्हाला माहिती आहे सुशांत सोबत काम करताना अंकिताला किती मानधन मिळायचं…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अंकिता हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मी अनेक प्रोजेक्ट मोफत करण्यासाठी देखील तयार आहे. कारण मी पैशांना कधी प्राथमिकता दिली नाही. मला फक्त चांगलं काम करायचं आहे. माझ्यासाठी पैसा कायम दुसऱ्या स्थानावर आहे. जी भूमिका मी साकारत आहे, ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आज देखील मी पैशांच्या मागे धावत नाही. मी कायम चांगल्या प्रोजेक्टच्या मागे धावते. जर मला उत्तम भूमिका मिळत असेल तर, मी मोफत काम करण्यास तयार आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत देखील मला चांगलं मानधन नव्हतं मिळत.’ अभिनेता रणदीप हुड्डा स्टारर सिनेमात अंकिताने मुख्य भूमिका साकारली आहे. ज्यासाठी अभिनेत्री एकही रुपये घेतलेला नाही…

इंडस्ट्रीबद्दल अंकिता म्हणाली, ‘गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल होत आहेत. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेपासून मी काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मी यशाच्या शिखरावर चढत आहे. तेव्हा मला दिवसाचे फक्त 2 हजार रुपये मिळायचे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

अंकिताच्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेता रणदीप हुड्डा यांनी वीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर देखील सिनेमाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अंकिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अंकिता स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;