शाळकरी मुले ई-सिगारेटच्या विळख्यात, रत्नागिरीत ई-सिगारेट विक्रीवर पोलिसांचा छापा

शाळकरी मुले ई-सिगारेटच्या विळख्यात, रत्नागिरीत ई-सिगारेट विक्रीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरीतील शाळकरी मुले ई-सिगारेटच्या जाळ्यात अडकली आहेत.याची गंभीर दखल घेऊन रत्नागिरी शहर पोलिसांनी रत्नागिरी शहरातील तेली आळी नाका येथील एका जनरल स्टोअरवर छापा टाकून तब्बल 1 लाख 72 हजार 500 रुपये किंमतीच्याव 69 ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दुकानमालक गोविंद दिनेश गजरा याला अटक करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील शाळकरी मुलांमध्ये कायद्याने प्रतिबंधित असलेल्या ई-सिगारेटच्या सेवनाचे प्रमाण वाढले होते. अनेकदा मुलांच्या दप्तरांमध्येही त्या ई सिगारेट सापडत होत्या. याबाबत शाळांमधील शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी ई-सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले.

आज, 4 ऑगस्ट 2025 रोजी, या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, तेली आळी नाका येथील जय गगनगिरी जनरल स्टोअरमध्ये ई-सिगारेटची विक्री होत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ दुकानावर छापा टाकला. या छाप्यात दुकानाचा मालक गोविंद गजरा याच्याकडून 1 लाख 72 हजार 500 रुपये किमतीच्या 69 ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या. ईलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठा आणि जाहिरात) कायदा 2019 कलम 7 व 8 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सपोफौ दिपक साळवी, पोहवा अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, प्रशांत पाटील आणि पोकॉ अमित पालवे यांचा समावेश होता.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शाळा-कॉलेज परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;