चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामात निष्काळजीपणा, लोखंडी सळी अंगावर पडून विद्यार्थी जखमी

चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामात निष्काळजीपणा, लोखंडी सळी अंगावर पडून विद्यार्थी जखमी

चिपळूण शहरात मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात पुन्हा एकदा निष्काळजीपणा समोर आला आहे. डीबीजे महाविद्यालयासमोर एका पिलरवरून टाकण्यात येत असलेली लोखंडी सळी अचानक रस्त्यावर कोसळून ती रस्त्याने जात असलेल्या विद्यार्थ्याच्या हातावर पडली. यात संबंधित विद्यार्थी बालंबाल बचावला असला तरी त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन छेडले. त्यामुळे सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही वर्षांपासून बहादूरशेखनाका ते पाग बौद्धवाडीदरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असून सुरुवातीपासूनच या कामाला विविध कारणांनी वादग्रस्त स्वरूप प्राप्त झाले आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी बहादूरशेख नाक्याजवळ गर्डर कोसळल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर काही महिन्यांत दोन कामगार पिलरवरून पडून गंभीर जखमी झाले होते. याशिवाय, सुरक्षेसाठी लावलेली जाळी ट्रकला अडकल्यानेही अपघात घडले होते.

अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांत संताप असून अनेकदा प्रशासनाने संबंधित ठेकेदार कंपनीला सुरक्षेच्या सूचना दिल्या होत्या. तरीही कामात निष्काळजीपणा दिसून येत आहे. सोमवारी घडलेली घटना हे त्याचेच ताजे उदाहरण ठरले. अथर्व शिंदे या विद्यार्थ्याच्या हातावर सळी पडून त्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;