प्रियांका-निकने लेक मालतीसह पहिल्यांदाच भारतात साजरी केली होळी

प्रियांका-निकने लेक मालतीसह पहिल्यांदाच भारतात साजरी केली होळी

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत भारतात धूमधडाक्यात होळी साजरी केली. प्रियांका आणि निकच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांकाने होळीनिमित्त जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत तिचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटो आणि व्हिडीओंमध्ये प्रियांकाची चुलत बहीण आणि ‘बिग बॉस 17’ फेम अभिनेत्री मन्नारा चोप्रासुद्धा दिसून येत आहे. प्रियांका-निकने लेक मालतीसह ढोलच्या तालावर ठेकासुद्धा धरला. त्याचाही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका भारतात आली. लग्नानंतर प्रियांका आणि निकने पहिल्यांदाच भारतात रंगपंचमी साजरी केली आहे.

चोप्रा कुटुंबीयांकडून आयोजित करण्यात आलेल्या रंगपंचमीच्या पार्टीत प्रियांका-निकने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर चिमुकली मालतीसुद्धा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि डोक्यावर टोपी लावून अत्यंत क्युट दिसत होती. या होळीच्या पार्टीत प्रियांकाची चुलत बहीण मन्नारा चोप्रासुद्धा सहभागी झाली होती. मन्नारा ‘बिग बॉस 17’ या शोमुळे घराघरात पोहोचली. होळीच्या पार्टीत तिने बहीण प्रियांकासोबत ठेकासुद्धा धरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Patty Cardona (@jerryxmimi)

अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केल्यानंतर प्रियांका परदेशात स्थायिक झाली. मात्र काही कार्यक्रमांनिमित्त ती भारतात ये-जा करत असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका तिच्या मुलीसह भारतात आली होती. तिच्यानंतर दोन दिवसांनी निकसुद्धा भारतात आला. भारतात आल्यानंतर प्रियांका सर्वांत आधी ‘बुलगारी’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिद्ध ब्रँडच्या शोरुमच्या उद्धाटनासाठी गेली. त्यानंतर निक, मालती आणि आई मधू चोप्रा यांच्यासह ती अयोध्येला राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी गेली होती. त्याचेही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Patty Cardona (@jerryxmimi)

प्रियांका आणि निक हे सर्वांत आधी सोशल मीडियाद्वारेच एकमेकांच्या संपर्कात आले. सप्टेंबर 2016 मध्ये निकने प्रियांकाला ट्विटरवर मेसेज केला होता. ‘आपल्या कॉमन मित्रमैत्रिणींकडून मला असं समजतंय की आपण भेटलं पाहिजे’, असा मेसेज त्याने प्रियांकाला केला होता. त्यानंतर प्रियांकाने एक दिवसाचा वेळ घेऊन निकला पर्सनलवर मेसेज करण्यास सांगितलं होतं. यानंतर दोघं एकमेकांशी बोलू आणि भेटू लागले होते. अखेर डिसेंबर 2018 मध्ये प्रियांका-निकने लग्न केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;