महापालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार; नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी

महापालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार; नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी

नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या मार्गातील अडथळे दूर झाले असून आता लवकरच महापालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे.

नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली आहे. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली आहे. या निकालामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालनंतर आता लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्याने आता नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुका जाहीर होऊ शकतात. नवीन वार्ड रचनेनुसारच या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील नाशिक महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, मुंबई महापालिका यांच्या प्रभाग रचनेमध्ये काही बदल करण्यात आले होते. मात्र नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या काही याचिका कोर्टात सादर करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायलयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात दिलेल्या निकालात स्पष्ट केलं होतं की , निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होतील, आणि प्रभाग रचना ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा असेल. मात्र, त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होणार आहे. त्यामुळे आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;