संगमेश्वरमध्ये अनोखी सामूहिक नांगरणी स्पर्धा; थरारक स्पर्धेत आराध्य किंजळकर, संदीप सुतार यांच्या जोडीने मारली बाजी

संगमेश्वरमध्ये अनोखी सामूहिक नांगरणी स्पर्धा; थरारक स्पर्धेत आराध्य किंजळकर, संदीप सुतार यांच्या जोडीने मारली बाजी

संगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे येथे सामूहिक नांगरणी स्पर्धेचा थरार शुक्रवारी रंगला होता. ही अनोखी स्पर्धा पाहायला प्रंचड गर्दी झाली होती. लाल मातीतील या स्पर्धेपूर्वी एकाचवेळी अनेक बैलजोड्या दाखल झाल्या होत्या. त्यांनी प्रथम नांगरणी केली आणि त्यानंतर या स्पर्धेचा थरार रंगला होता. चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी या स्पर्धेला भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

सामूहिक नांगरणी व भातलावणी कार्यक्रमाचा आरंभ संगमेश्वर- चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातील 2011 ला तालुक्यातील सरंद येथे प्रथम सामूहिक भातलावणी आणि चिखल स्पर्धेला सुरवात झाली. अकरा वर्षानंतर प्रथमच एकाच वेळी अनेक बैलजोड्या दाखल होत विक्रम झाला आहे. स्पर्धेचे नियोजन शेतकरी संघटना आंबव पोंक्ष ग्रामस्थ मंडळाने केले होते. शिट्टी वाजताच बैलजोड्या झेप घेऊन वेगात पळत होत्या. कमी वेळातअंतर कापण्यासाठी जोमाने दौडत होत्या आणि त्याच्या जोडीला सुरेख समालोचन आणि प्रेक्षकांची तेवढीच दाद देखील मिळत होती.

विजेत्यांना चषक व रोख बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. सामूहिक चिखलणी झाल्यावर झालेल्या स्पर्थेत घाटी जोड्यांमध्ये आराध्या किंजळकर (बुरंबाड), संजय वामन सावंत (पाली), सुजल संदीप पिलणकर(आरवली), राहुल बोल्ये (आंबव), संदीप बाळू सुतार (आंबव), देवजी भायजे (आंबव), श्री मानोबा (माखजन) यांनी बाजी मारली. तर
गावठी गटामध्ये संदीप सुतार(आंबव), संबा काटोकारी (मार्लेश्वर), संजय लांडगे, भैरी चंडिका प्रसन्न (शिरवली), गणेश सुनील येलोंडे (तुरळ), मन्या देसाई (तुरळ), जय संबा (पाटगाव), महाकाली प्रसन्न (कुंभार्ली), जयदेव धामणाक (कडवई), गंगोबा प्रसन्न (निवे) यांनी बाजी मारली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;