हिंदुस्थानकडून युक्रेन युद्धाला निधी पुरवण्याचे काम, ट्रम्प सरकारची टीका

हिंदुस्थानकडून युक्रेन युद्धाला निधी पुरवण्याचे काम, ट्रम्प सरकारची टीका

हिंदुस्थानकडून युक्रेन युद्धाला निधी पुरवण्याचे काम सुरू आहे अशी टीका ट्रम्प सरकारने केली आहे. तसेच ही बाब अतिशय आश्चर्यजनक असल्याचे म्हटले आहे.

इंडिया टुडेने दिलेले वृत्तानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक वरिष्ठ सल्लागार स्टीफन मिलर यांनी हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल टीका केली आहे. त्यांनी हिंदुस्थानवर अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला निधी पुरवल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प प्रशासन रशियाकडून अजूनही तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे.

स्टीफन मिलर, हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावशाली सल्लागारांपैकी एक आहेत, यांनी सांगितले की ट्रम्प यांना स्पष्टपणे असे वाटते की हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी. ट्रम्प यांनी अत्यंत स्पष्टपणे म्हटले आहे की हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करत युद्धाला निधी पुरवणे हे स्वीकारार्ह नाही असेही मिलर म्हणाले.

मिलर यांनी हिंदुस्थान आणि चीन या दोघांचाही रशियन तेल खरेदीत सारखाच वाटा असल्याचे सांगितले आणि यावर आश्चर्य व्यक्त केले. लोकांना हे ऐकून धक्का बसेल की हिंदुस्थान रशियन तेल खरेदीत चीनच्या बरोबरीने आहे. हे खूप आश्चर्यकारक आहे असेही मिलर म्हणाले. असे असले तरी ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध ‘उत्कृष्ट’ आहेत अशी पुस्तीही त्यानी जोडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;