झेडपी, पंचायत समितीसाठी मतदान यंत्रांची तपासणी सुरू

झेडपी, पंचायत समितीसाठी मतदान यंत्रांची तपासणी सुरू

गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱया मतदान यंत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. केडगाव येथील निवडणूक आयोगाच्या गोडावूनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सहा हजार मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात आली असून, या यंत्रांची प्रथम तपासणी गेल्या सोमवारपासून सुरू आहे. पुढील आठवडय़ात बुधवारपर्यंत ही तपासणी सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अहिल्यानगर जिह्यात फेब्रुवारी 2022 पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. या निवडणूक घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या प्रभाग रचनांवर आलेल्या हरकती आणि सूचना निकाली काढण्याची कार्यवाही सुरू आहे. 18 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात सर्व जिल्हाधिकाऱयांची आढावा बैठक घेतली आहे. यात प्रत्येक जिह्यात किती मतदान केंद्रे, मतदान यंत्रे, निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, निवडणूक निर्णय अधिकारी याची माहिती घेऊन त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.

दरम्यान, नगर जिह्यासाठी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी सहा हजार मतदान यंत्रे उपलब्ध झाली आहेत. जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाच्या वतीने मतदान यंत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या यंत्रामध्ये बीयू, सीयू, मेमरी चिप यांचा समावेश आहे. उपलब्ध झालेल्या यंत्रांच्या तपासणीनंतर जिह्यासाठी आणखी किती यंत्रणांची गरज भासणार हे स्पष्ट होणार आहे.

मंगळवारी विभागीय आढावा

राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी मागील महिन्यांत राज्यातील सर्व जिह्यांतील जिल्हाधिकाऱयांकडून ऑनलाइन आढावा घेतला आहे. आता मंगळवारी (दि. 5) रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत नाशिकला विभागातील पाचही जिह्यांतील जिल्हाधिकाऱयांकडून आढावा घेण्यात येणार आहे. ‘निवडणूक आयोग आपल्या दारी’ या उपक्रमात आयोगाचे प्रमुख अधिकारी नाशिकला येऊन विभागातील सर्व जिल्हाधिकाऱयांकडून निवडणूक तयारीची माहिती घेणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;