मुंबई, कोकण तापणार; विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

मुंबई, कोकण तापणार; विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

यंदा मार्च महिन्यात रात्री आणि पहाटे गारवा जाणवत होता. मात्र, आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सरासरी तापमानात वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यात पारा 40 अंशांवर पोहचला आहे. तर कोकण आणि मुंबईत तापमान 35 अंशांच्या वर गेले आहे. आता पुढील दोन दिवस मुंबई आणि कोकणातील तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवड्यात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

पुढील चार ते पाच दिवस राज्यात कमाल तापमानात 2 ते 3 अंशानी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही आर्द्रतेचे प्रमाण वाढणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईची आर्द्रता 75 टक्क्यांची आसपास वाढण्याची शक्यता आहे. त्यावेळी शहरात 38 अंश तापमान जाणवेल. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

पुढील 24 तासांत पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर ओडिशा, पूर्व झारखंड, पूर्व विदर्भ, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली येथे पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात हवामान ढगाळ राहणार असून काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;