जालन्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सुरू असताना निलम टाॅकीजला लागली आग

जालन्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सुरू असताना निलम टाॅकीजला लागली आग

जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या निलम टॉकीजमध्ये 25 मार्च रोजी रात्रीचा शो चालू असताना कुलरला आग लागल्याने थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला. यामुळे दर्शकांमध्ये घबराटीचे वातावरण होऊन लोकं सिनेमा हॉलच्या बाहेर पडले.
 निलम टॉकीजमध्ये’ स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील चरित्रात्मक चित्रपटाचे शो सुरु आहेत. चित्रपटात रणदिप हुड्डा यांनी सावरकरांची मुख्य भूमिका साकारली असून देशभरात हा चित्रपट सुरु आहे. अशातच जालना शहरातील निलम टॉकीज येथे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. त्यातच कुलरमध्ये अचानक आग लागल्याने चित्रपटगृहात अचानक धूर पसरला. थिएटर व्यवस्थापनाने तात्काळ अग्निशमन दलास पाचारण केले असता अर्ध्या तासात अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, फायरमॅन नितेश ढाकणे, प्रदीप बापू देशमुख सह कर्मचाऱ्यांनी आगीवर नियत्रंण मिळवण्यासाठी पराश्रम घेतले.
शो चालू असताना आग लागल्याने अर्धवट चित्रपट पाहून लोकं सिनेमा हाॕल बाहेर आले असता त्यांनी थिएटर मालकाला तिकिटाचे पैसे परत करण्याचा आग्रह केला. ज्या लोकांनी चित्रपट पाहण्यासाठी तिकिटे काढली होती त्यांना त्याच तिकिटावर दुसऱ्या दिवशी थिएटर चालू झाल्यावर पुढचा शो दाखविला जाणार असल्याचे थिएटर मालक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;