Lok Sabha Election 2024 – चंद्रपूरमधून कॉँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर रिंगणात
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून कॉँग्रेसची चंद्रपूरची एकमेव जागा निवडून आली होती. भाजपने येथून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील चंद्रपुरातील लढत फार महत्त्वाची ठरणार आहे.
धाराशिवसाठी प्रवीण परदेशी फेटाबांधून तयार
धाराशिव लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत ही जागा नेमकं कोणत्या पक्षाला सुटणार हेही निश्चित झालेलं नाही. भाजपकडून माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी येथून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. परदेशी हे गावदौरे करत असून फेटा बांधून तयार असल्याचं दिसून आलं. तर, राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदार यांनाही अजित पवारांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List