मनोज जरांगे पाटील यांची लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली

मनोज जरांगे पाटील यांची लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टचा अपघात झाल आहे. पहिल्या मजल्यावरून लिफ्ट आदळून थेट जमिनीवर कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात जरांगे पाटील थोडक्यात बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेले होते. याच वेळी दुपारी अडीचच्या दरमन्या लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. यावेळी जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे काही सहकारी लिफ्टमध्ये होते. लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;