मंडलिक, मानेंच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना रिंगणात उतरवण्यात आले. दुसरीकडे महायुतीत उमेदवार कोण असणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलीक शिंदे गटात असले तरी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास महायुतीतून विरोध होत आहे. हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून महाविकास आघाडीने महायुतीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. संजय मंडलीक यांचा त्यांच्यासमोर टिकाव लागणे शक्य नाही. त्यामुळे भाजप हा मतदारसंघ ताब्यात घेऊन तेथून आपला उमेदवार देण्याची चर्चा सुरू आहे. मंडलीक यांच्याऐवजी समरजित घाडगे यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंडलीक यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे यांनी फोन करून मला कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असल्याचा दावा केला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माझं तिकीट कापले जाणार ही केवळ अफवा असून तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होत असल्याने उमेदवारी घोषित करण्यासाठी थोडा उशीर होत आहे. मात्र पुढील काही तासांमध्ये उमेदवारी घोषित केली जाईल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List