मत्स्यव्यवसाय विभागाचा खोडा; रायगडमधील बोटी मासेमारीला गेल्याच नाहीत

मत्स्यव्यवसाय विभागाचा खोडा; रायगडमधील बोटी मासेमारीला गेल्याच नाहीत

पावसाळ्यातील दोन महिन्यांच्या बंदीनंतर 1 ऑगस्टपासून दर्याचा राजा मासेमारीसाठी समुद्रात झेपावला आहे. मात्र मत्स्यविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांची पहिल्याच दिवशी कोंडी झाली आहे. मत्स्यविभागाने रायगडातील मच्छीमारांना ऐनवेळी इंडियन ऑईलकडून डिझेलचा कोटा घेण्यास मनाई केली आहे. या फतव्याने हजारो बोटी मासेमारीसाठी गेल्याच नसून ठिकठिकाणच्या बंदरांमध्ये अडकून पडल्या आहेत. त्यामुळे पहिला हंगामच वाया जाण्याची शक्यता असल्याने मच्छीमार संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतील 138 मच्छीमार संस्थांच्या ७७९६ मासेमारी यांत्रिक नौकांना एक लाख 68 हजार 109.78 किलो लिटर करमुक्त डिझेल कोटा मंजूर करण्यात आला आहे. मात्र 31 जुलै रोजी उशिराने मंजूर करण्यात आलेल्या पत्रात रायगड जिल्ह्यातील 41 मच्छीमार संस्थांना इंडियन ऑईल कंपनी बगळून करमुक्त डिझेल खरेदी करण्याचा फतवा मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी काढला आहे. परंतु अन्य ऑईल कंपनीकडून डिझेल खरेदी करायचे झाल्यास अनेक मच्छीमार संस्थांकडे एक्स्पोसिव्ह परवाने, डिझेल पंप, डिझेल वाहतूक करणाऱ्या सर्वाधिक गाड्याही इंडियन ऑईल कंपनीच्याच आहेत. त्यामुळे मच्छीमारांची कोंडी झाली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील यांनी दिली.

खासगी पंपांवर 20 रुपये अधिक मोजावे लागणार

अन्य तेल कंपन्यांकडून डिझेल खरेदी करायचे झाल्यास अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यामुळे शुक्रवारी मासेमारीसाठी निघालेल्या मच्छीमार बोटींना डिझेलच मिळाले नाही. आज शनिवार व उद्या रविवार असे दोन दिवस सुट्टीचे असल्याने याबाबत तोडगा निघण्यास विलंब होणार आहे. खासगी पंपावरून डिझेल खरेदी करावयाचे झाल्यास प्रती लिटर 18 ते 20 रुपये ज्यादा मोजावे लागणार आहेत, असे वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट असोसिएशनचे संचालक रमेश नाखवा यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;