अमरावतीत आदिवासी महिलांकडून पारदर्शक साडय़ांची होळी; नवनीत राणांना सुनावले
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी होळी महोत्सवानिमित्त भेट म्हणून आदिवासी महिलांना साडय़ांचे वाटप केले. या साडय़ा पारदर्शक असल्याने महिलांकडून मोठय़ा प्रमाणावर त्यास विरोध होत आहे. नवनीत राणा, तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीच्या साडय़ा भेट म्हणून दिलात ही भेट नसून आमच्या अब्रूचे धिंदवडे काढण्याचा खोडसाळपणा करत आहात, असे खडेबोल संतप्त महिलांनी सुनावत पारदर्शक साडय़ांची होळी केली.
आमच्या मतावर राज्य करून इतके दिवस सत्ता उपभोगलात, पण आता यानंतर या मेळघाटमध्ये तुम्ही मते मागायला अजिबात येऊ नका, अशा शब्दांत नवनीत राणा यांनी केलेल्या साडी वाटपावरून महिलांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही पोस्टवर ज्या पद्धतीच्या सुंदर साडय़ा छापल्या तशा साडय़ा आम्हाला न देता भलत्याच साडय़ा देत आहात. आम्हाला दिलेली साडी तुम्ही स्वतः घालून समाजामध्ये फिरू शकता का, असा सवाल महिलांनी राणा यांना केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List