भाजपने 37 खासदारांना दाखवला घरचा रस्ता; पाचव्या यादीत कंगना, अरुण गोविल यांना तिकीट

भाजपने 37 खासदारांना दाखवला घरचा रस्ता; पाचव्या यादीत कंगना, अरुण गोविल यांना तिकीट

लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पाचवी यादी भारतीय जनता पार्टीने जाहीर केली आहे. यात 111 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, यावेळी पक्षाने केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे, वीके सिंह आणि वरुण गांधी यांच्यासह तब्बल 37 विद्यमान खासदारांना घरी बसवले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री कंगना रनौत आणि छोटय़ा पडद्यावर प्रभू श्रीरामाची भूमिका जिवंत करणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल यांना यावेळी लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना संबळपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. 2019 मध्ये प्रधान यांचा पराभव झाला होता. कर्नाटकातून सहा वेळा खासदार राहिलेल्या अनंत कुमार हेगडे यांना मात्र तिकीट देण्यात आलेले नाही. हेगडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. उत्तर प्रदेशातील नऊ, गुजरातमधील पाच, ओडिशातील चार आणि बिहार, कर्नाटक, झारखंडमध्ये प्रत्येक तीन खासदारांना यावेळी पक्षाने तिकीट दिलेले नाही.

आयात नेत्यांना संधी

अन्य पक्षातून भाजपात आलेल्या सीता सोरेन, तापस रॉय आणि एन. किरण कुमार रेड्डी यांना पक्षाने मैदानात उतरवले आहे. काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदल यांना कुरुक्षेत्र आणि जितीन प्रसाद यांना पीलभीत येथून तिकीट देण्यात आले आहे. भाजपचे केरळमधील प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र हे वायनाडमधून राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;