अभाविपला झटका, जेएनयूत पुन्हा डावेच ‘उजवे’

अभाविपला झटका, जेएनयूत पुन्हा डावेच ‘उजवे’

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी पार पडलेल्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांनी दणदणीत विजय मिळवत आरएसएसशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि संयुक्त सचिव अशा चार जागा डाव्यांनी जिंकल्या असून या विजयामुळे तब्बल 28 वर्षांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेला दलित अध्यक्ष मिळाला आहे. विजयानंतर ‘लाल सलाम’ आणि ‘जय भीम’ अशा घोषणांनी संपूर्ण विद्यापीठाचा परिसर दुमदुमला.

जेएनयूमध्ये चार वर्षांनी विद्यार्थी संघटनेची निवडणूक 22 मार्चला पार पडली. यंदा विक्रमी 73 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत 2 हजार 598 मते मिळवत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (आयएसा) धनंजय हे अध्यक्ष बनले. धनंजय यांनी ‘अभाविप’च्या उमेश अजमेरा यांचा पराभव केला. त्यांना केवळ 1 हजार 676 मते मिळाली. उपाध्यक्ष अविजित घोष यांना 2649 मते मिळाली आणि त्यांनी अभाविपच्या दीपिका शर्मा यांचा 927 मतांनी पराभव केला. ‘बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन’च्या प्रियांशी आर्य यांनी डाव्या आघाडीच्या मदतीने सरचिटणीस पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला. प्रियांशी यांनी ‘अभाविप’च्या अर्जुन आनंद यांचा 926 मतांनी पराभव केला. संयुक्त सचिवपदी डावे उमेदवार मोहम्मद साजिद यांनी 2893 मते मिळवून विजय मिळवला.

जेएनयूमध्ये 28 वर्षांनंतर दलित अध्यक्ष

1996-97मध्ये दलित समाजील भट्टीलाल बैरवा ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले होते. त्यांच्यानंतर जवळपास 28 वर्षांनंतर डाव्यांचे धनंजय हे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बनले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;