आयफोन 25 हजारांनी महागणार

आयफोन 25 हजारांनी महागणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानला जोरदार फटका बसणार आहे. हिंदुस्थानातून अमेरिकेत आयात होणाऱ्या आयफोनलाही याचा दणका बसणार असून आयफोनच्या किमती 25 हजार रुपयांपर्यंत महागणार आहेत.

ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अ‍ॅपल कंपनीला आपल्या धोरणात बदल करावा लागण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानात बनवण्यात येणारे जवळपास 25 टक्के आयफोन हे अमेरिकेत विकले जातात. कंपनीला अमेरिकेसाठी दरवर्षी सहा कोटी आयफोन बनवावे लागतात. अमेरिकेला इतक्या मोठ्या प्रमाणात आयफोनचा पुरवठा करण्यासाठी अ‍ॅपलला प्रोडक्शन वाढवण्याची आवश्यकता वाटत होती, परंतु ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ बॉम्बमुळे कंपनीला आता या योजनेचा फेरविचार करावा लागू शकतो.

मार्च 2025 च्या अखेरपर्यंत अ‍ॅपल कंपनीने हिंदुस्थानात जवळपास 22 बिलियन डॉलर म्हणजेच 1.83 लाख कोटी आयफोन बनवले आहेत. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 60 टक्के अधिक आहेत. जगात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पाचपैकी एक फोन हिंदुस्थानात बनवलेला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;