ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे कमबॅक; पाकिस्तानचा पत्ता कट होणार

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे कमबॅक; पाकिस्तानचा पत्ता कट होणार

लॉस एंजेलिसमध्ये होणाऱया 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 128 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेत केवळ 6 पुरुष आणि 6 महिला संघांना सहभागी होता येईल, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.  मात्र या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड व श्रीलंका आदी मोठय़ा संघांचा पत्ता कट होण्याची शक्यता बळावली आहे.

लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये कोणते सहा देश खेळणार हे अद्यापि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांनी जाहीर केलेले नाही. शिवाय ऑलिम्पिक 2028 साठी पात्रतेचे निकषही स्पष्ट करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे क्रिकेटसारखा ऐतिहासिक खेळ कोणत्या 6 संघांसह ऑलिम्पिकमध्ये दिसणार, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

ऑलिम्पिक क्रिकेट पात्रता प्रक्रिया काय असेल?

‘आयसीसी’च्या सिंगापूरमध्ये होणाऱया वार्षिक बैठकीत ऑलिम्पिकसाठी पात्रतेची अंतिम रूपरेषा तयार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटमध्येही ‘आयओसी’प्रमाणेच पाच खंडीय पात्रता पद्धती अवलंबली जाणार आहे. या प्रस्तावानुसार, आशिया, ओशिनिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या पाच खंडांमधून प्रत्येकी एक संघ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल. या प्रक्रियेच्या आधारे सध्याच्या टी-20 क्रमवारीनुसार हिंदुस्थान (आशिया), ऑस्ट्रेलिया (ओशिनिया), ब्रिटन (युरोप), दक्षिण आफ्रिका (आफ्रिका) हे संघ आपापल्या खंडांचे प्रतिनिधित्व करतील. अमेरिका यजमान देश म्हणून थेट प्रवेश मिळवेल. सहाव्या संघासाठी वेस्ट इंडीजचे नाव समोर येत आहे, मात्र त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवली जाईल. महिला संघांची घोषणा मात्र 2026 मध्ये होणाऱया टी-20 विश्वचषकानंतर केली जाईल. पाच खंडीय पात्रता प्रणालीद्वारे संघनिवड निश्चित झाली तर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांसारख्या संघांचा ऑलिम्पिकमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. कारण न्यूझीलंड टी-20 क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या मागे आहे, तर आशियाई देशांमध्ये हिंदुस्थान सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान यांना संधी मिळणार नाही. अहवालानुसार, न्यूझीलंड आणि पाकिस्तानने या प्रस्तावित पात्रता प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;