अमेरिकेत F-35 लढाऊ विमान कोसळले; पॅराशूटने उडी मारल्याने पायलट थोडक्यात बचावला

अमेरिकेत F-35 लढाऊ विमान कोसळले; पॅराशूटने उडी मारल्याने पायलट थोडक्यात बचावला

अमेरिकेत नौदलाचे F-35 लढाऊ विमान अमेरिकेत दुर्घटनाग्रस्त झाले आहे. नौदलाचे F-35 लढाऊ विमान बुधवारी (अमेरिकन वेळेनुसार) अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये कोसळले. हे लढाऊ विमान लेमूर येथील नौदलाच्या हवाई तळावर कोसळले आहे. नौदलाने याची पुष्टी केली आहे. बुधवारी पहाटे 4.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, अपघाताच्या वेळी पायलटने प्रसंगावधान दाखवत योग्य वेळत पॅराशूटद्वारे उडी घेत जीव वाचवला. त्यामुळे दुर्घटनेतून तो सुरक्षितपणे बचावला आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.

अमेरिकन वेळेनुसार बुधवारी पहाटे 4.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. नौदलाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की अपघाताच्या वेळी वैमानिकाने पॅराशूटद्वारे वेळेवर बाहेर पडून आपला जीव वाचवला. तो सुरक्षित आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अपघाताचे कारण अद्याप कळलेले नाही. नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की हे विमान फायटर स्क्वॉड्रन VF‑125 रफ रेडर्सचा भाग होते. हे युनिट फ्लीट रिप्लेसमेंट स्क्वॉड्रन म्हणून काम करते, ज्याचे मुख्य काम वैमानिक आणि एअरक्रूला प्रशिक्षण देणे आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अपघाताच्या व्हिडिओमध्ये धुराचे लोट उठताना दिसत आहेत. या अपघाताचा नौदल तळाच्या ऑपरेशनवर काय परिणाम झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;