सौदीत ‘ड्रगन बॉल’ पार्क
सौदी अरेबियाने अनोखे थीम पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. हे थीम पार्क जपानमधील लोकप्रिय ऑनिमेटेड सीरीज ‘ड्रगन बॉल’वर आधारित असेल. 125 एकर जागेत पसरलेल्या थीम पार्कमध्ये मध्यभागी ड्रगन असेल. ड्रगन साधारण 229 फूट उंच असेल आणि पार्कमध्ये 30 राईड्स तरी असतील.
सौदी अरेबिया सरकारची पंपनी क्विद्दीया इन्व्हेस्टमेंट पंपनीकडे थीम पार्कचे काम देण्यात आले आहे. क्विद्दीया इन्व्हेस्टमेंट पंपनी आणि ‘ड्रगन बॉल’ सीरीजची निर्माता पंपनी टोई ऑनिमेशन यांची ही भागीदारी आहे. ‘ड्रगन बॉल’ सीरीजचे निर्माता अकिरा टोरियामा यांचे निधन झाल्यानंतर थीम पार्कची घोषणा करण्यात आली. 1 मार्च रोजी वयाच्या 68 व्या वर्षी टोरियामा यांचे निधन झाले. 1984 साली ‘द ड्रगन बॉल’ या कॉमिक सीरीजला सुरुवात झाली. सन गोकु नावाच्या मुलाला एक ड्रगन बॉल मिळतो, ज्यामुळे मुलाला सुपर पॉवर मिळते, यावर सीरीज आधारित होती. हे जपानमधील बेस्ट सेलिंग कॉमिक ठरले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List