केवायसी नसलेले फास्टॅग 1 एप्रिलपासून बंद
फास्टॅगचे केवायसी करणे महत्त्वपूर्ण असून जर ग्राहकांनी फास्टॅगचे केवायसी बँकेतून अपडेट केले नसल्यास अशा ग्राहकांचे फास्टॅग अकाऊंट 1 एप्रिलपासून बंद केले जाणार आहे. केवायसी नसलेले फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट केले जातील. फास्टॅगमध्ये शिल्लक रक्कम असूनही पेमेंट करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना फास्टॅग केवायसीसाठी फक्त आठ दिवस उरले आहेत. एनएचएआयने फास्टॅग ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. जेणेकरून फास्टॅग सुविधा कोणत्याही अडचणीशिवाय प्रदान करता येईल. पारदर्शकता आणण्यासाठी आणि फास्टॅगद्वारे टोल वसूल करण्यासाठी टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी एनएचएआयने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ मोहीम सुरू केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List