राजापूरात गंगामाईचे आगमन, शिमगोत्सवात गंगास्नानाची पर्वणी

राजापूरात गंगामाईचे आगमन, शिमगोत्सवात गंगास्नानाची पर्वणी

राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील गंगा तिर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन झाले आहे. गंगामाईचे गेल्या काही वर्षात सातत्याने आगमन आणि निर्गमन होत आहे. रविवारी पहाटे गंगामाईचे आगमन झाले. सुमारे सहा महिन्यानंतर पुन्हा गंगामाईचे आगमन झाले आहे.

शिमगोत्सवाच्या काळामध्ये गंगामाईचे आगमन झाल्यास अनेक गावच्या ग्रामदेवतांच्या पालख्या गंगामाईच्या भेटीला जातात. गेल्या अनेक वर्षापासूनची प्रथा परंपरा गावोगावी जपली गेली आहे. यंदाही शिमगोत्सवात गंगामाईच्चे आगमन झाल्यामुळे ग्रामदेवतेची पालखी गंगामाईच्या भेटीला जातील. यावेळी ग्रामस्थ गंगास्नानाची पर्वणी साधतात. गंगा देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत घुगरे यांनी सांगितले की, गंगामाईचे रविवारी पहाटे आगमन झाले आहे. मूळ गंगेसह सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. गंगामाईच्या आगमनाची बातमी समजताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक उन्हाळे गावी दाखल होतात. आता उद्यापासून गंगा तिर्थक्षेत्री भाविकांची गर्दी होणार आहे. शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले आहेत. गंगामाईचे आगमन ही त्यांच्यासाठी पर्वणी आहे. गंगामाईचे दर्शन घेऊन, स्नान करून हे चाकरमानी आपल्या घरी रवाना होतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;