IPL 2024: हार्दिक व रोहितचे चाहते स्टेडीयममध्ये भिडले, तुफान हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
रविवारी अहमबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात हार्दिक पांड्याला रोहित शर्मा याच्या चाहत्यांचा रोष पत्करावा लागला. नाणेफेक करण्यासाठी आलेला असतानाही हार्दिकविरोधात रोहितच्या चाहत्यांनी घोषणा दिल्या. हार्दिकला संपूर्ण सामनाभर हिटमॅनच्या चाहत्यांच्या या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र या दरम्यान स्टेडियममध्ये सामना सुरू असतानाच हार्दिक व रोहितचे चाहते थेट स्टेडियममध्ये भिडल्याचे समोर आले आहे. या चाहत्यांच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांमध्ये झालेल्या भांडणाचे कारण समोर आलेले नाही.
Kalesh b/w A MI Fan and GT fans during Yesterday IPL match b/w MI and GT inside Narendra’ Modi Stadium
pic.twitter.com/x91FruSCVs— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 25, 2024
दरम्यान या लढतीतील आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामुळे कर्णधार हार्दिक पंड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. नरेंद्र मोदी मैदानावर सामना सुरू असताना शेवटच्या षटकामध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या क्षेत्ररक्षण लावत होता. यावेळी त्याने रोहित शर्माला थेट सीमारेषेवर तैनात केले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हार्दिकने ज्या पद्धतीने रोहितला पळवले ते पाहून चाहते संतापले आहेत.
Modi Ji to Nadda Ji – pic.twitter.com/OpwO4vCLze
— Narundar (@NarundarM) March 24, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List