Lok Sabha Election 2024 – उदयनराजे अद्याप वेटिंगवरच, दुसऱ्या यादीतही नाव नाही
सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सातार्याची लोकसभा लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. उदयनराजे भोसले यांच्या तिकीट मिळावे म्हणून दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. भाजपने आतापर्यंत राज्यातील 23 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात अद्याप उदयनराजे भोसले यांना स्थान न मिळाल्याने राजे सध्या अस्वस्थ झाले आहेत.
रविवारी भाजपने त्यांची देशभरातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यात त्यांनी महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची घोषणा केली. मात्र यातही उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने भाजप राजेंचे तिकीट कापते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
अमित शहा यांची भेट नाही मिळाली’
उदयनराजे हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायला दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून होते. मात्र अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट झाली नसल्याचे समजते. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत सातार्यातून संधी मिळेल अशी आशा उदयनराजे भोसले यांना होती. भाजपने त्यांना ठेंगा दाखवला. त्यामुळे नाराज झालेल्या राजेंनी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीचा वेळ मागितला. मात्र तीन दिवस उलटूनही शहांनी उदयनराजेंना भेट दिली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List