जालन्यातील कडवंची येथे शेततळ्यात बुडून मायलेकांचा करुण अंत

जालन्यातील कडवंची येथे शेततळ्यात बुडून मायलेकांचा करुण अंत

शेततळ्यात बुडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील कडवंची येथे घडली. समाधान मानिक वानखेडे (23) आणि सुमित्रा मानिक वानखेडे( 40) अशी मयत दोघांची नावे आहेत.

समाधान आणि त्याची आई सुमित्रा दोघे ही सकाळच्या सुमारास त्यांच्या शेतात गेले होते, मात्र दुपार झाली दोन्ही जण अजून कसे परतले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते कुठे ही मिळून आले नाही. दरम्यान काही वेळानंतर त्यांच्या नातेवाईकांना शेत तळ्यात काही तरी तरांगतांना दिसले त्यावरून नातेवाईकांनी त्यात शोध घेतला असता दोघांचे मृतदेह त्यात आढलून आले.

सदर घटना कळताच मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केलाय. नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात तपासणीसाठी आणले असता उपस्थित डॉक्टरांनी त्या दोघांना तपासून मृत घोषित केलय. घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शव विच्छेदन गृहात पाठविण्यात आले आहेत,या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;