दुर्देवी! केरळच्या कोट्टनकुलंगारा मंदिरात रथयात्रेत चाकाखाली येऊन पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू
केरळमधील कोल्लमजवळील प्रसिद्ध कोट्टनकुलंगारा मंदिरात वार्षिक उत्सवादरम्यान भयंकर अपघात घडला. उत्सवादरम्यान काढण्यात आलेल्या रथयात्रेत रथाच्या चाकाखाली येऊन पाच वर्षांच्या मुलीचा चिरडून मृत्यू झाला. ही मुलगी तिच्या पालकांसोबत उत्सवात सहभागी होण्यासाठी आली होती.
क्षेत्रा (5) असे त्या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. कोट्टनकुलंगारा मंदिरात दरवर्षी वार्षिक उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी होण्यासाठी दूरदूरवरून भाविक येतात. पारंपरिक पद्धतीने रथयात्रा काढली जाते. चावरा येथून पाच वर्षांची मुलगी तिच्या पालकांसह उत्सवात सहभागी होण्यासाठी आली होती. क्षेत्राचे आई-वडील रथाच्या अगदी जवळून चालत होते. त्यामुळे भाविक रथ ओढण्याचाही प्रयत्न करतात. दरम्यान, चुकून पाच वर्षांची मुलगी रथाखाली आली. कोणाला काही समजण्याआधीच रथाचे चाक तिच्या अंगावर आले. जमावाने कसेतरी मुलीला रथाच्या चाकाखालून बाहेर काढले. पालकांनी तिला स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही मुलीला वाचवता आले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार , ही दुर्घटना रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली. आई-वडिलांसोबत ती मंदिरात आली होती. कधी कधी मुलं रथाला बांधलेली दोरीही ओढतात. ती चुकून पडली असे दिसते. पोलिसांनी या घटनेविरोधात एफआयआर दाखल केला आहे. उत्सवादरम्यान रथयात्रा सुरू असलेल्या मोकळ्या मैदानात ही घटना घडली. तर दुसरीकडे रथयात्रा आणि उत्सव पाहण्यासाठी आलेल्या पीडित कुटुंबाची दयनीय अवस्था आहे. सणाच्या आनंदात त्यांच्या घरावर शोककळा पसरली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List