राहुरी तालुक्यातील वळणला गावठी कट्टा तर गंगापुरला तलवार बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक
राहुरी तालुक्यातील वळण येथील दादासाहेब उर्फ कृष्णा शंकर कुलट हा तरुण कंबरेला गावठी कट्टा बाळगत तर गंगापुर येथे विठ्ठल अशोक जांभुळकर हा तरुण हातात तलवार घेऊन दहशत करीत असल्याची माहिती राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळताच दोन्ही ठिकाणी पोलीस पथके पाठवून दोन्ही तरुणांना गजाआड करण्यात आले.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील वळण येथिल हनुमान मंदिर परिसरात दादासाहेब उर्फ कृष्णा शंकर कुलट (25)रा. वळण ता. राहुरी हा कमरेला गावठी कट्टा लावून थांबलेला होता. पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार कृष्णा कुलट यास ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला गावठी कट्टा सापडला. गावठी कट्टयासह ताब्यात घेवून त्याच्या विरोधात राहुरी पोलीस स्टेशन येथे कलम 3/25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके हे करीत आहेत.
गंगापुर ता.राहुरी येथील गावात विठ्ठल अशोक जांभुळकर हा तरुण हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकातील अंमलदार यांनी संबंधित ठिकाणी जाऊन सापळा लावून विठ्ठल अशोक जांभुळकर, वय 22 वर्षे, रा. गंगापूर ता. राहुरी यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्ट मध्ये पाठीमागील बाजूस कंबरेला असलेली तलवार ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द राहुरी पोस्टे गुरंन 323/2024 शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.काँ. सोमनाथ जायभाय हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर डॉ.बसवराज शिवपुजे आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.काँ. सोमनाथ जायभाय, सुरज गायकवाड, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पो. कॉ. नदीम शेख, प्रमोद ढाकणे, गोवर्धन कदम, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजने, रवी पवार,आदिनाथ पाखरे, पोलीस नाईक संतोष दरेकर, सचिन धनाड आदींनी केली आहे.
गुन्ह्यातुन वाचवतो पण लाख रुपये मोजावे लागतील
राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी हाथी घेतले आहे. परंतू पथकातील एक पोलिस कर्मचारी प्रत्येक गुन्ह्यात पैसे कमाई करण्यासाठी गुन्हेगारांच्या नातेवाईकांना गाठतो. या गुन्ह्यातुन तुमच्या मुलाला वाचवू पण लाख रुपये मोजावे लागतील असे सांगतो.मध्यंतरी विज मोटार चोरीच्या गुन्ह्यात आदीवासी समाजाच्या महिलेकडून एक लाख रुपये घेवून तुझ्या भावाला वाचवितो असे सांगितले, एक लाख घेवूनही त्या आदीवासी तरुणावर गुन्हा दाखल केला. लाख रुपये गेले आणि गुन्हा दाखल झाला.चोरीच्या गुन्ह्यात काहीही संबध नसताना केवळ पैशासाठी चांगल्या घरातील तरुणांना गुंतवून पैसे कमविण्याचा या पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रताप चालवले आहे. या सर्व गोष्टी पोलिस निरीक्षकांना माहित असतानाही त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रतापाला बळ देण्यात येत असल्याने हि पोलिसांची मिली भगत तर नाही ना? अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List