नड्डांच्या पत्नीच्या गाडी चोरीवरून रोहित पवारांचा भाजपवर निशाणा; ‘पोलिसांचा वापर फक्त…’
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या पत्नीची गाडी मल्लिका नड्डा यांची लक्झरी कार चोरी झाली आहे. यावरून आता विरोधकांनी भाजप आणि सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला जोरदार टोला हाणला आहे. पोलिसांचा वापर काय फक्त शेतकऱ्यांना अडवण्यासाठी आणि विरोधी पक्षाच्या नेत्याला ताब्यात घेण्यासाठीच केला जातोय का?, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
‘संपूर्ण देशाची सत्ता हाती असलेल्या महाशक्तीच्या सर्वोच्च नेत्याच्या पत्नीचीच गाडी चोरीला जात असेल तर दिल्ली पोलिसांचा वापर काय फक्त शेतकऱ्यांना अडवण्यासाठी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याला ताब्यात घेण्यासाठीच केला जातोय का? यावरून हेही स्पष्ट होतं की, जिथं महाशक्तीच्या मुखियाच्या पत्नीचीच गाडी सुरक्षित नाही तिथं देश कसा सुरक्षित राहणार?’ असं रोहित पवार यांनी आपल्या X वरील पोस्टमधून म्हटलं आहे.
संपूर्ण देशाची सत्ता हाती असलेल्या #महाशक्तीच्या सर्वोच्च नेत्याच्या पत्नीचीच गाडी चोरीला जात असेल तर दिल्ली पोलिसांचा वापर काय फक्त शेतकऱ्यांना अडवण्यासाठी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याला ताब्यात घेण्यासाठीच केला जातोय का? यावरून… pic.twitter.com/coqEZ9B81m
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 25, 2024
जे.पी. नड्डा यांची पत्नी मल्लिका नड्डा यांची लक्झरी कार चोरी झाली आहे. दिल्लीतील एका सर्व्हिस सेंटरमधून ही कार चोरी झाल्याची माहिती मिळतेय. 19 मार्च रोजी ही घटना घडली असून चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नड्डा यांच्या पत्नीची फॉर्च्यूनर कार (क्र. एचपी 03 डी 0021) चालक दिल्लीतील गोविंदपुरी भागातील एका सर्व्हिस सेंटरला घेऊन गेला होता. 19 मार्च रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान ही कार चोरी झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
राजधानी दिल्लीमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसांगणिक वाढ होत आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की दिल्ली-एनसीआरमध्ये दर मिनिटाला एक गाडी चोरीला होती. एसीकएच्या एका अहवालानुसार 2022 आणि 2023मध्ये हिंदुस्थानमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये तब्बल अडीच पट वाढ झाली आहे. या रिपोर्टमध्ये आणखीही काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. चोरांची नजर कोणत्या वाहनांवर असते? चोरीच्या घटनांचे हॉटस्पॉट कोणते? कोणत्या शहरात सर्वाधिक वाहन चोरी होते? याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List