नातवाने वडिलांचे निधन झाल्याचे लपवले, आजीने मुलाला पाहण्याचा हट्ट धरल्यानंतर त्याने घेतली एआयची मदत

नातवाने वडिलांचे निधन झाल्याचे लपवले, आजीने मुलाला पाहण्याचा हट्ट धरल्यानंतर त्याने घेतली एआयची मदत

चीनमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वडिलांच्या निधनाने आजीला धक्का बसेल. ती सहन करु शकणार नाही या भितीपोटी नातवाने 6 महिने आपल्या आजीपासून वडिलांचे निधन झाल्याचे सत्य लपवले. मात्र आजीने वडिलांना पाहाण्याचा अट्टाहास धरल्यानंतर नातवाने जे केले त्याचे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.

सून याच्या वडिलांना कर्करोग झाल्याने त्यांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले. पण 91 वर्षीय आपल्या आजीला हे दु:ख सहन होणार नाही. त्यामुळे तिला वडिल आजारी असून ते बिजिंगच्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले. पण सहा महिने आपल्या मुलाला न पाहिल्याने आजीने सूनकडे मुलाला पाहण्याचा तगादा लावला. अखेर वडिलांना पुनर्जिवित करण्यासाठी एआय तंत्राची मदत घेतली. त्याने आजीला सांगितले की, वडिलांना रुग्णालयात मोबाईल फोन ठेवण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्याने वडिलांचा व्हिडिओ रेकॉर्डींग करुन आणला आहे. जुने फोटो आणि फेस-स्वॅप सॉफ्टवेअर च्या मदतीने नातवाने आपल्या वडिलांचा चेहरा स्वतःवर ठेवला आणि त्यांच्या आवाजाची नक्कल केली. व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे-‘आई, मी बीजिंगला आहे आणि ठीक आहे. येथील डॉक्टर हा आजार बरा करू शकत नाहीत, मात्र तो आटोक्यात आहे असे सांगितले. त्यानंतर आजीला व्हिडीओ दाखवण्यापूर्वी त्याची क्वाॉलिटी तपासण्यासाठी त्याने तो व्हिडिओ त्याच्या काकीला पाठवला. सुनने सांगितले की, आजीची दृष्टी कमी झाली आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यात आपला मुलगा असल्याचे त्यांनी गृहीत धरले.

याचा व्हिडिओ सूनने त्याच्या Douyin अकाउंट @Zaixisancai वर पोस्ट केला आहे ज्याला 5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोक खूप कमेंट करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;