मुलीला ताप आला होता! ती रात्र मी अजिबात विसरू शकणार नाही, असे का म्हणाला सुनील शेट्टी

मुलीला ताप आला होता! ती रात्र मी अजिबात विसरू शकणार नाही, असे का म्हणाला सुनील शेट्टी

‘बाॅर्डर’ हा चित्रपट आठवल्यावर त्यातील अनेक कलाकार आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे सुनील शेट्टी.  1997 साली प्रदर्शित झालेला बॉर्डर सिनेमा, आजही प्रेक्षकांना आवडतो. मुख्य म्हणजे या सिनेमातील प्रत्येक पात्र आजही लोकांच्या मनात घर करुन आहे.  या चित्रपटात अनेक हिट गाणी आहेत मात्र त्यातील एक ‘तो चलू’ हे गाणं सध्या चर्चेत आहे कारण सुनिल शेट्टी यांनी या गाण्यामागची एक इनसाइट स्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनेते सुनिल शेट्टी यांनी पिंक व्हिलाला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला. सिनेमातील गाण्याच्या शूटिंगसाठी सुनिल शेट्टीने त्यांच्या बायकोला आणि मुलीला सोडून सिनेमाला प्राधान्य दिलं होतं. सुरुवातीला सुहागरात सॉंग ‘तो चलूँ’ या गाण्याच्या शूटींगदरम्यान मी थोडा बैचेन झालो होतो, असं सुनिल शेट्टी यांनी सांगितलं.  पण त्यानंतर मी सिनेमाचे डायरेक्टर जेपी दत्ता यांच्याशी बोललो आणि माझं मन शांत झालं, असे ते यावेळी म्हणाले.

सुनिल शेट्टी यांनी पुढे सांगितलं की, या गाण्याचं शूटींग आयुष्यभर माझ्या लक्षात राहिलं. यावेळी माझी मुलगी अथिया फक्त 3 वर्षांची होती. हे गाणं ज्या दिवशी शूट झालं त्या रात्री माझी मुलगी खूप आजारी होती. त्यावेळी ती तापाने फणफणत होती. आणि तेव्हा दिल्लीत वादळ येण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे मला तिला दिल्लीहून मुंबईला पाठवावे लागले होते. त्यामुळे हे शूटींग माझ्या चांगलच लक्षात राहिलंय, असे सुनिल शेट्टी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;