भाजपकडून तिकीट मिळताच कंगनाचं ते ट्विट जोरदार व्हायरल; काय म्हणाली होती कंगना?

भाजपकडून तिकीट मिळताच कंगनाचं ते ट्विट जोरदार व्हायरल; काय म्हणाली होती कंगना?

अभिनेत्री कंगना रणौतला भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडीमधून तिकीट दिलं आहे. त्यामुळे कंगनाचा अधिकृतपणे राजकारणात प्रवेश झाला आहे. कंगनाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिचं एक जुनं ट्विट सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. राजकारणात आल्यानंतर काय करणार आहे? याची माहिती देणारं हे कंगनाचं ट्विट आहे. आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना कंगनाने हे ट्विट केलं होतं. तिचं हे ट्विट आता तुफान व्हायरल होत असून कंगना बोलल्याप्रमाणेच वागणार का? असा सवाल नेटकरी करताना दिसत आहेत.

कंगना रणौतला भाजपकडून तिकीट जाहीर झालं. त्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. माझ्या प्रिय देशाला आणि भाजपला मी नेहमीच बिनशर्त पाठिंबा दिला आहे. भाजपच्या नेतृत्वाने माझी जन्मभूमी असलेल्या हिमाचल प्रदेशातील मंडीमधून मला उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याच्या नेतृत्वाच्या निर्णयाचं मी स्वागत करते आणि त्याचं पालन करेल. अधिकृतपणे पक्षात सामील झाल्याने सन्मान झाल्यासारखं वाटतंय. माझ्या मनात नवा उत्साह संचारला आहे. योग्य कार्यकर्ता आणि विश्वासून सेवक बनण्याचा माझा प्रयत्न राहील, असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय होतं ट्विट?

तीन वर्षापूर्वी एका यूजरने कंगनाला टॅग करून ट्विट केलं होतं. कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवेल, माझं म्हणणं लिहून ठेवा, असं या यूजरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्याला कंगनाने उत्तर दिलं होतं. 2019च्या निवडणुकीत मला ग्वाल्हेरचा पर्याय दिला होता. हिमाचल प्रदेशाची लोकसंख्या जेमतेम 60 ते 70 लाख आहे. तिथे कोणी गरीब नाही. तिथे गुन्हे घडत नाहीत. राजकारणात आले तर ज्या राज्यात समस्या आहेत. तिथूनच निवडणूक लढेल. मी त्या मतदारसंघात काम करू शकते आणि राणी बनू शकते, असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर एक वर्षानंतर लगेच कंगनाने घुमजाव केलं होतं. भाजपने तिकीट दिलं तर मी मंडीमधून लढायला तयार आहे, असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर तिला मंडीतून तिकीट देण्यात आलं आहे.

 

पहिल्यांदाच मंडीत

मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपने बॉलिवूड कलाकाराला तिकीट दिलं आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने आतापर्यंत मंडीतून फिल्मी कलाकाराला तिकीट दिलं नव्हतं. काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी या मतदारसंघातून लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधून कंगनाच्या विरोधात कोण लढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;