Health Tips – वजन कमी करण्यासाठी ‘या’ भाकरीचा आहारात समावेश करा, मिळतील खूप सारे फायदे
अनेकदा आपल्या घरामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर हा प्रामुख्याने होत असतो. परंतु गव्हाव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी खाणे देखील खूप फायदेशीर आहे. ही भाकरी खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत राहतेच, शिवाय त्याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासूनही आराम मिळतो.

ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे
ज्वारीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन-बी, कॉम्प्लेक्स असे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
ज्वारीमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते, ज्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्या देखील उद्भवत नाहीत.
Health Tips – हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी आहारामध्ये हे बदल करुन बघा, वाचा
ज्वारीची भाकरी खाल्ल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही. त्यात असलेले फायबर पोट भरलेले ठेवते, ज्यामुळे वजन नियंत्रित करणे सोपे होते.
ज्वारी हृदयरोगापासून बचाव करते. त्यात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदय निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी ज्वारीची भाकरी खाणे सर्वात उत्तम मानले जाते.
ज्वारीची भाकरी खाल्ल्याने हाडे देखील मजबूत होतात. ज्वारीमध्ये असलेले प्रथिने स्नायू आणि हाडांना ताकद देतात.
ज्वारी ग्लूटेन मुक्त आहे. जे ग्लूटेन मुक्त अन्न खातात त्यांच्यासाठी ज्वारी हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे.
ज्वारीला आपल्या आहारामध्ये हे खूप महत्त्वाचं स्थान आहे. ज्वारीत असलेल्या कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि प्रथिने यांसारख्या घटकांमुळे वजन कमी करण्यासाठी ज्वारी फार महत्त्वाची मानली जाते. आपल्यापैकी अनेक घरांमध्ये गव्हाच्या पिठाच्या पोळ्या बनवल्या जातात. ज्वारीच्या भाकरीचा आहारातील समावेश हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पचनसंस्था मजबूत होतेच, शिवाय अनेक आजारांपासूनही आराम मिळतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

Comment List