मोबाइल चार्जरनं पेट घेतला; 4 मुले जिवंत जळाली
काळजी न घेतल्यास मोबाइल आणि त्यामुळे घडणाऱ्या अपघातांची संख्या वाढत चालली आहे. मेरठमध्ये शनिवारी रात्री मोबाईल चार्जरमुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या खोलीतील बेडला आग लागल्यानं चार मुले गंभीर भाजली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचे आई-वडील, बबिता आणि जॉनी, झोपेत असलेल्या त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी खोलीत धावले आणि ते देखील भाजले गेले. त्यांना जखमाही झाल्या. बबिता दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तर जॉनी मेरठमध्ये उपचार घेत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एसपी आयुष विक्रम सिंह म्हणाले, ‘पीडितांना तातडीने एलएलआरएम मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे रात्री 9.30 च्या सुमारास दोन मुलांचा मृत्यू झाला’.
तिसऱ्या मुलाचा रविवारी पहाटे दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत असताना मृत्यू झाला. काही तासांनंतर सारिका यांचे निधन झाले. रोजंदारीवर काम करणारा जॉनी उपचारानंतर बरा होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List