येथे खेळली जाते रक्ताची होळी; बोरी गदाजी येथील आगळीवेगळी परंपरा

येथे खेळली जाते रक्ताची होळी; बोरी गदाजी येथील आगळीवेगळी परंपरा

>> यवतमाळ : प्रसाद नायगावकर

धुळवड म्हणलं की विविध रंग छटा आणि असंख्य रंगांनी न्हाऊन निघालेले चेहरे अशीच कल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील बोरी गदाजी एक असे गाव आहे ज्या ठिकाणी रक्ताची होळी खेळली जाते. होय, अगदी खरं आहे. आपण जे ऐकत आहात ते अगदी खरं आहे. या गावी रक्ताची होळी खेळली जाते. ते ही मागील पन्नास वर्षापासून ही परंपरा चालू आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील बोरी गदाजी हे गाव रक्तरंजित होळी करिता दरवर्षी चर्चित असते. गदाजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या या गावांमध्ये मागील पन्नास वर्षांपासून ही परंपरा अविरत चालू आहे. होळी च्या दिवशी या गावी तुफान दगडफेक होते. ही दगडफेक आकसापोटी किंवा भांडणातून नव्हे तर परंपरेचा एक भाग म्हणून पाळला जातो. दर वर्षी फाल्गुन मास पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी या गावी गदाजी महाराज यांची भव्य यात्रा भरते. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात. आलेले भाविक एकमेकांवर तुफान दगडफेक करतात ही दगडफेक श्रद्धेचा भाग म्हणून पाळला जाते. विशेष बाब अशी की एकमेकांचे रक्त निघेपर्यंत ही दगडफेक सुरूच असते.

या परंपरेचे मागील आख्यायिका अशी आहे की पन्नास वर्षांपूर्वी या गावी गदाजी महाराज यांचे वास्तव्य होतं. एके दिवशी त्यांनी लहान मुलाला दगड फेकून मारले असता तो मुलगा जागीच ठार झाला. या घटने ने गावकरी खवळले आणि गदाजी महाराज यांना बांधून ठेवले. तेंव्हा गदाजी महाराज यांना सांगितले की मृत झालेल्या मुलाला होळीचे भस्म लावा तो जिवंत होईल. आणि झालेही तसेच. या घटनेच्या प्रभावाने पुढे दरवर्षी त्या ठिकाणी होळी च्या दिवशी दगडफेक करुन रक्तरंजीत करण्याची होळी सुरू झाली. ती ती आजही तशीच सुरू आहे.

या दिवशी सकाळी गावकरी मिळून प्रतीकात्मक शवयात्रा काढतात. त्या नंतर संस्था प्रांगणात जाऊन आंघोळ व पूजा विधि आटोपतात. त्यानंतर दोन-तीन भाविक जवळील एका टेकडीवर जाऊन गोटमार सुरू करतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून गावकरी दगडफेक सुरू करतात आणि ही दगडफेक तो पर्यंत सुरू असते जो पर्यंत तिथे उपस्थित भाविक रक्त बंबाळ होत नाही तोपर्यंत हे सत्र सुरूच असते.

प्रशासकीय पातळीवरून ही परंपरा बंद करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मात्र गावकऱ्यांचा विश्वास या परंपरेवर कायम राहिला आणि रक्तरंजित होळी खेळणे मात्र आजही चालू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;