उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छा वर्षाव; राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर येऊन केले अभीष्टचिंतन… आनंद द्विगुणित झाला!

उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छा वर्षाव; राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर येऊन केले अभीष्टचिंतन… आनंद द्विगुणित झाला!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आज विशेष ठरला. मुंबईमहाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मातोश्रीनिवासस्थानी येऊन उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले. दोन्ही बंधूंची गळाभेट झाली. दोघेही मातोश्रीमधील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन साहेबांच्या आसनासमोर नतमस्तक झाले. राज ठाकरे यांच्या भेटीने आणि शुभेच्छांनी आनंद द्विगुणित झाला, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. संपूर्ण महाराष्ट्रही ठाकरे बंधूंच्या या भेटीने पुन्हा एकदा आनंदला. बंधूभेटीचा हा सुवर्णक्षण हजारो मोबाईल आणि कॅमेऱ्यांमध्ये शेकडो वेळा क्लिक झाला.

शिवसैनिकांची पंढरी असलेल्या ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी सकाळपासूनच वारीसारखी गर्दी लोटली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांसह सामान्य नागरिक, शिवसेनाप्रेमी तसेच राजकीय, सामाजिक, कला, साहित्य क्षेत्रातील मंडळींनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

शिवसेनाप्रमुखांच्या आसनापुढे नतमस्तक

राज ठाकरे यांनी गुलाबांचा बुके देऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांचीही गळाभेट झाली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या आसनासमोर दोघेही नतमस्तक झाले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांवरही चर्चा झाली. जवळपास 20 मिनिटे राज ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानी होते. यावेळी दोन्ही बंधूंमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. नंतर निघतानाही उद्धव ठाकरे राज यांना सोडायला बाहेर आले. सगळय़ांना हात उंचावून नमस्कार करत राज परतले.

राहुल गांधी, शरद पवार, स्टॅलिन, व्ही. के. सिंह यांच्यासह मान्यवरांकडून वाढदिवसानिमित्त सदिच्छा

देशभरातील मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त एक्स पोस्टच्या माध्यमातून तसेच फोन करून शुभेच्छा दिल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हिताची व अधिकारांची लढाई आपण एकत्र लढू, अशा भावना व्यक्त करत अभीष्टचिंतन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, मिझोरामचे राज्यपाल व्ही. के. सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते राजीव शुक्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;