Taapsee Pannu Wedding : अभिनेत्री तापसी पन्नूने प्रियकर मॅथियाससोबत गुपचूप उरकले लग्न

Taapsee Pannu Wedding : अभिनेत्री तापसी पन्नूने प्रियकर मॅथियाससोबत गुपचूप उरकले लग्न

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने तिचा प्रियकर बॅडमिंटनपटू मॅथियास बो याच्यासोबत गुपचूप लग्न केले आहे, यावेळी तापसीच्या कुटुंबातील काही जवळचे लोक उपस्थित होते.

वृत्तानुसार, तापसी पन्नू आणि तिचा प्रियकर माजी ऑलंपिक पदक विजेता मॅथियास याच्यासोबत 23 जानेवारी रोजी लग्नाच्या बंधनात अडकली. त्यांचे लग्न उदयपुरमध्ये लग्न सोहळा पार पडला. सुत्रांच्या माहितीनुसार,  लग्नाच्याविधी 20 मार्चपासून सुरु झाल्या होत्या. दोघंही आपला हा खास दिवस आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत साजरा करु इच्छित होते. त्यासाठी त्यांनी खासगी पद्धतीनेच लग्न केले. या वेळी फक्त कौटुंबिक सदस्य आणि त्यांचा जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. अनुराग कश्यप आणि कनिका  ढिल्लोन  हे काही सेलिब्रिटी लग्नाला उपस्थित होते. मात्र लग्नाबाबत तापसीकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pavail Gulati (@pavailgulati)


तापसी पन्नूचा ‘थप्पड’ मधील सह-कलाकार पावेल गुलाटी याने लग्नाचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये अभिनेता अभिलाष थापियाल देखील दिसतोय. तापसी लवकरच मित्रांना मुंबईत लग्नाची पार्टी देणार असल्याचीही चर्चा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;