कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी विद्या राणी निवडणुकीच्या रिंगणात; एनटीकेने दिली उमेदवारी
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन यांची एकेकाळी दहशत होती. सुमारे दोन दशकांपूर्वी स्पेशल टास्क फोर्सने केलेल्या कारवाईत वीरप्पनचा मृत्यू झाला होता. त्याची मुलगी विद्या राणी आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तमिळनाडूतील कृष्णगिरी या मतदारसंघातून त्यांना नाम तमिझार काची (एनटीके) या पक्षाने उमेदवारी दिली आहे.
विद्या राणी यांनी 2020 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यांना तमिळनाडू भाजपच्या युवा शाखेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, त्यांनी नुकतेच भाजप सोडून एनटीकेमध्ये प्रवेस केला आहे. आता याच पक्षाकडून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून विद्या राणी या राजकारणात सक्रिय आहेत. कृष्णगिरीमध्ये त्या एक शाळा चालवतात. बंगळुरू शहरात त्यांनी पाच वर्षे वकिलीचे शिक्षण घेतले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List