श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे अभिनेत्रीच्या आयुष्यातील Special One?

श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे अभिनेत्रीच्या आयुष्यातील Special One?

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या आगामी ‘स्त्री 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री पुन्हा अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चत आली आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एन्ट्री झाली आहे.. अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. पण आता श्रद्धाने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी श्रद्धाचा ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा लेखक राहुल मोदी याच्यासोबत एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. जामनगर येथील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता श्रद्धाच्या एका फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

जामनगरमध्ये दोघे एकत्र दिसले तेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागला. तेव्हापासून ही जोडी सतत चर्चेत असते. इतकंच नाही तर रविवारी 24 मार्च रोजी श्रद्धाने असं काही केले ज्यामुळे चाहत्यांना खात्री झाली की ती राहुल मोदींना डेट करत आहे.

श्रद्धाचं नाव राहुल मोदीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पण दोघांनी देखील यावर अधि्कृत घोषणा केलेली नाही. पण आता अभिनेत्री खास फोटो पोस्ट करत मोठा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये श्रद्धा कपूर हिच्या गळ्यात ‘R’ अक्षराचा एक पेंडेंट दिसत आहे. पण अभिनेत्री अधिकृत घोषणा केलेली नाही.

सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त श्रद्ध कपूर आणि तिच्या गळ्यात असलेल्या आर नावाच्या पेंडेंटची चर्चा रंगील आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, “कुछ नहीं, श्रृंडे है तो कुछ नहीं कर रही।’ सध्या एका आर अक्षराच्या पेंडेंटमुळे श्रद्धा चर्चेत आली आहे.

श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. श्रद्धाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;