अयोध्येतील राम मंदिरात जाताना प्रियांकाने नेसली तब्बल इतक्या रुपयांची साडी
बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. प्रियांका नुकतीच भारतात आली होती आणि या दौऱ्यादरम्यान तिने अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं.
प्रियांकासोबत यावेळी तिचा पती निक जोनास, मुलगी मालती मेरी आणि आई मधू चोप्रासुद्धा होते. अयोध्येतील राम मंदिरात जाताना प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर निकने कुर्ता परिधान केला होता. प्रियांकाच्या पिवळ्या साडीने खास नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं.
प्रियांकाची ही साडी 'रॉ मँगो' (Raw Mango) या ब्रँडची असून त्याची किंमत तब्बल 60 हजार रुपयांहून अधिक आहे. पिवळ्या रंगाच्या या चंदेरी सिल्क साडीला गोल्डन बॉर्डर होती. त्यावर फुलं आणि पानांची बारिक डिझाइनसुद्धा होती. या साडीवर प्लेन ब्लाऊज, कानात सोनेरी इअररिंग्स आणि हातात पिवळ्या रंगाच्या बांगड्या असा तिचा लूक होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List