वडिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी पार्टनर शोधतेय ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री; चुकून दिला फोन नंबर

वडिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी पार्टनर शोधतेय ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री; चुकून दिला फोन नंबर

सलमान खानच्या ‘बिग बॉस’मध्ये झळकलेली अभिनेत्री मनिषा राणीने नुकताच ‘झलक दिखला जा 11’ या डान्स शोचं विजेतेपद पटकावलंय. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. शो जिंकल्यानंतर मनिषा ट्रॉफी घेऊन बिहारमधल्या तिच्या घरी परतली. यावेळी कुटुंबीयांनी तिचा यश कसा साजरा केला, त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. मनिषा बिहारमधील मंगर याठिकाणी राहते. शो जिंकल्यानंतर मनिषाचं जंगी स्वागत करण्यासाठी तिचे कुटुंबीय, नातेवाईक तिच्या घरी पोहोचले होते. या व्लॉगमध्ये मनिषाने तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा उल्लेख केला.

नातेवाईकांसोबत जंगी सेलिब्रेशन केल्यानंतर मनिषा तिच्या बहिणींसोबत तिच्या रुममध्ये गेली. यावेळी तिला मिळालेल्या भेटवस्तू सर्व बहिणी मिळून उघडून पाहत होत्या. यावेळी मनिषाला मिळालेली रक्कमसुद्धा तिच्या बहिणी मोजू लागतात. इतक्यात तिचे वडील फ्रेममध्ये येतात आणि ते मनिषाचे नक्कल करून दाखवतात. या व्हिडीओत पुढे मनिषा म्हणते, “आम्ही सर्वजण मंगरला आलोय आणि इथे माझ्या विजयाचं सेलिब्रेशन केलं. लोकांकडून माझ्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होतोय. मला वाटलं होतं की पाहुणे येणार नाहीत. पण अनेकजण इथे माझ्या स्वागतासाठी होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Manisha Rani (@manisharani002)

या व्हिडीओत पुढे मनिषा तिच्या वडिलांविषयी बोलू लागते, “माझ्या वडिलांना त्यांच्या डोक्यावरचे केस वाढवायचे आहेत. त्यामुळे सर्वोत्कृष्ट तेल किंवा तेलाची ट्रिटमेंट तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझे वडील त्यांच्या लग्नासाठी मुलगी शोधत आहेत, माफ करा महिला शोधत आहेत. आम्ही वडिलांसाठी लाइफ पार्टनरच्या शोधात आहोत. जर कोणाला त्यांच्यात रस असेल तर कृपया कमेंट करून कळवा.” हे सांगतानाच मनिषा आणि तिचे वडील चुकून त्यांचा फोन नंबरसुद्धा सांगतात. मनिषाला जेव्हा ही चूक समजते, तेव्हा ती लगेच वडिलांना थांबवते.

‘झलक दिखला जा 11’मध्ये मनिषाने खुलासा केला होता की तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर ती वडिलांच्या नकळत आईला भेटायला जाते. मनिषा लहान असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या वडिलांनीच तीन मुलांचा सांभाळ केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;