राज्यात धरणातील पाणीसाठ्यात घट; पाणीटंचाई बिकट होण्याची शक्यता
मार्च महिना संपत आला असून आता एप्रिलमध्ये राज्यात उन्हाचा ताप वाढत जाणार आहे. वाढत्या उन्हासह राज्यात पाणी टंचाईची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाळ्यात पावसाने जवळपास महिनाभर ओढ दिली. तसेच पावसाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचा विचार करता पुढील दोन महिने काही जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
राज्यातील धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी याच कालात राज्यातील धरणांत 54 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यावर्षी पाणीसाठ्यात 14 टक्क्यांची घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आतापासूनच अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई जाणावत असून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यातील धरणात फक्त 21 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावासाळ्यापर्यंत हे पाणी पुरवण्याचे आव्हान आहे.
कोकणातील धरणांमध्ये 53 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कोकणात समाधानकारक स्थिती आहे. मात्र, माजलगाव, उजनी आणि धाराशिवमधील धरणे शून्य टक्क्यांवर आली आहेत. राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने, टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच अनेक गावात विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट बिकट होण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List