प्रतिभा धानोरकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

प्रतिभा धानोरकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

>>प्रसाद नायगावकर

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांच्या दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. थोडक्यात निभावल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. हा अपघात खंबाळा गावाजवळ चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात झाला.

आज प्रतिभा धानोरकर या दिल्लीवरून नागपूर इथे पोहचल्या. नागपूर एरपोर्टवर त्याचे समर्थकांनी भव्य स्वागत केले. कालच काँग्रेसने चंद्रपूर वणी मतदार संघासाठी प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. कार्यकर्त्यांच्या स्वागतानंतर त्या चाहत्यांच्या मोठ्या ताफ्यासोबत आपला मतदार संघ चंद्रपूर येथे निघाल्या होता. अशातच खंबाळा येथे हा अपघात झाला. यात या गाडीतील कार्यकर्ते किरकोळ जखमी झालेत. प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना दुसऱ्या गाडीत रवाना केले. त्यानंतर हा ताफा चंद्रपूर कडे रवाना झाला. प्रतिभा धानोरकरांच्या गाडीमागे आपली गाडी असावी या चढाओढीत हा अपघात झाला असावा असे बोलले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;