भाजपचे ॲड.रामदास शेजुळ यांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपचे ॲड.रामदास शेजुळ यांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ॲड.रामदास शेजुळ यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी थोरात म्हणाले की, चांगल्या कामामुळे संगमनेर तालुक्याचा राज्यात आणि देशात सन्मान झाला आहे. तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची मोठी संधी आपल्याला मिळाली. यामध्ये तालुक्यातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. तालुक्यात कार्यकर्त्यांची अत्यंत चांगली फळी आहे. सर्व सहकारी संस्था चांगल्या सुरू आहेत. येथील राजकारण, समाजकारण राज्याला दिशादर्शक आहे. काम करणाऱ्याला संधी मिळत असून कधीही भेदभाव केला जात नाही कार्यकर्त्यांना कायम सन्मान आहे, असे त्यांनी सांगितले.

या उलट अनेक ठिकाणी स्वार्थी राजकारण असते. संगमनेरमध्ये सन्मानाचे राजकारण आहे. रामदास शेजुळ यांनी व्यक्तिगत कधी टीकाटिप्पणी केली नाही. तालुक्याच्या विकासात खोडा घालण्याचे काम अनेक लोक करत आहेत. अशांतता निर्माण करत आहेत. परंतु आता जनतेने त्यांना ओळखले आहे. विकासाची व चांगल्या कामाची तालुक्याची ओळख असल्याने हीच परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायचे असल्याचे ते म्हणाले.

ॲड. रामदास शेजुळ म्हणाले की, स्वगृही परतल्याचा मला आनंद आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. भाजपमध्येही अत्यंत निष्ठेने काम केले. परंतु त्या ठिकाणी स्वार्थ आहे. बाळासाहेब थोरात व थोरात घराणे हे निस्वार्थी काम करत आहे. त्यांच्या चांगल्या कामाचा राज्यभर लौकिक आहे. त्यामुळे आपण काँग्रेसमध्ये आलो असून पक्षाचे निष्ठेने काम करू असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;