पाथर्डीच्या विविध बाजारपेठेत बनावट नोटांचा सुळसुळाट

पाथर्डीच्या विविध बाजारपेठेत बनावट नोटांचा सुळसुळाट

पाथर्डी शहरासह तालुक्यातील अनेक गावच्या व्यापारी पेठेत शंभर व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आल्याने व्यापारी व ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या बनावट नोटांचा कागद हलका जरी असला तरीही या नोटांचा रंग हुबेहूब बनावट नोटांसारखा असल्याने ग्राहकांना ही नोट खरी की खोटी हे कळणे दुरापास्त झाले आहे.

अनेक व्यावसायिकांनी आपली फसगत होऊ नये म्हणून बनावट नोटा ओळखण्याचे मशीन आपल्या दुकानात लावले आहे. या नोटा नेमकी कुठून आल्या व कोणी आणल्या समजू शकत नाही. तर या संदर्भात कोणीही पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा न केल्याने सध्या मात्र अनेकांची फसगत होत आहे. शंभरच्या नोटांचे दहा हजारचे बंडल तर दोनशे रुपयांच्या नोटांचे वीस हजारचे बंडल करून एखाद्या व्यापाऱ्याला दिले तर त्याला या बंडल मधील बनावट नोट नेमकी कोणती आहे हे समजत नसल्याने अनेकांची फसगत होत आहे. शहरातील अनेक तरुण विविध बँका व पतसंस्थांमध्ये दैनिक बचत प्रतिनिधी म्हणून काम करतात. या प्रतिनिधींना सुद्धा रोजच्या कलेक्शन मधून या बनावट नोटा आल्या आहेत.  दुसऱ्या दिवशी बँकेत किंवा पतसंस्थेत पैसे भरण्यासाठी गेल्या नंतर बनावट नोट लक्षात येत असल्याने व ती नेमकी कोणी दिली हे लक्षात न आल्याने अनेकांची फसवणूक झाली आहे. या बनावट नोटा नेमक्या कोणी आणल्या याचा शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

सध्या व्यापारी पेठेत मोठ्या प्रमाणात शंभर व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या असून त्या लवकर ओळखता येत नसल्याने अनेकांची फसगत होत आहे.
श्रीकांत जाजू ,औषध विक्रेते

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;