रंगबाजीने निवडणूक लढवत असाल तरी आम्ही घाबरणारे नाही; बच्चू कडू यांचा इशारा

रंगबाजीने निवडणूक लढवत असाल तरी आम्ही घाबरणारे नाही; बच्चू कडू यांचा इशारा

प्रहारचे बच्चू कडू महायुतीत नाराज असून त्यांनी पुन्हा एकदा वेगळा विचार करण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी नवनीत राणा आणि भाजपवर टीका केली आहे. रंगबाजीने निवडणूक लढवली जात असेल तर आम्ही घाबरणारे नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तुमच्यासोबत कुणाचा आशीर्वाद आहेत? त्याची मस्ती आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आरोपांच्या रंगबाजीने जर निवडणूक लढवली जात असेल तर, आम्ही कोणाला घाबरणारे नाही. ही पैशाची, सत्तेची मस्ती आहे की, तुमच्यासोबत कुणाचा आशीर्वाद आहे? त्याची मस्ती आहे का, असा सवाल बच्चू कडूंनी विचारत राणांवर निशाणा साधला आहे. राणांचा प्रचार करायचा नाही, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे कार्यकात्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेऊ. आमची नाराजी नवनीत राणांवर आहे. कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घ्यावे लागेल. या नाराजीमुळे बच्चू कडू स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;