हट्टीपणा सोडा, हिंदुस्थानशी संबंध सुधारा; मुइज्जू यांना माजी राष्ट्राध्यक्षांचा सल्ला

हट्टीपणा सोडा, हिंदुस्थानशी संबंध सुधारा; मुइज्जू यांना माजी राष्ट्राध्यक्षांचा सल्ला

हिंदुस्थानाने बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना त्यांच्याच देशात नाराजीचा सामना करावा लागत आहे. अशातच आता मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहीन मोहम्मद सोलिह यांनी मुइज्जू यांच्यावर निशाणा साधत हट्टीपणा सोडून हिंदुस्थानसोबतचे संबंध सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी त्यांचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना त्यांच्या ‘हट्टी’पणा सोडा आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शेजाऱ्यांशी संवाद साधायला हवा असा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वी चीन समर्थक समजल्या जाणाऱ्या मुइज्जू यांनी हिंदुस्थानला मालदीवला कर्जमाफी देण्याचे आवाहन केले होते तेव्हा सोलिह यांनी ही टिप्पणी केली. माफन्नू यांच्या चार संसदीय मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीच्या (एमडीपी) उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी माले येथे आयोजित कार्यक्रमात सोलिह म्हणाले की, मुइज्जू कर्जाच्या पुनर्गठनाचा विचार करत असल्याचे सूचित करणारे मीडिया रिपोर्ट्स त्यांनी पाहिले आहेत. त्यासाठी त्यांना हिंदुस्थानाशी बोलायचे आहे. मात्र ही आर्थिक आव्हाने हिंदुस्थानच्या कर्जामुळे नाहीत असे सोलिह यांनी म्हंटले आहे.

सोलिह म्हणाले की, मालदीवचे चीनवर 18 अब्ज मालदीवियन रुफिया (एमव्हिआर) कर्ज आहे, तर हिंदुस्थानावर 8 अब्ज एमव्हिआर कर्ज आहे आणि त्याची परतफेड करण्याची मुदत देखील 25 वर्षे आहे. ” मला खात्री आहे की आमचे शेजारी मदत करतील,” तुम्ही हट्टीपणा सोडून बोलणे सुरू केले पाहिजे. आम्हाला मदत करणारे अनेक पक्ष आहेत. पण मुइज्जू यांना तडजोड करायची नाही अशी टीका त्यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;