लग्नाला 8 वर्षे, बेबी प्लान कधी? कुटुंबाकडून होणाऱ्या दबावाबद्दल अभिनेत्री म्हणाली…

लग्नाला 8 वर्षे, बेबी प्लान कधी? कुटुंबाकडून होणाऱ्या दबावाबद्दल अभिनेत्री म्हणाली…

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘ये है मोहब्बतें’ मालिकेत ईशी मां म्हणून दिव्यांका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही मालिकेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता दिव्यांका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने बेबी प्लानिंगवर मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘विवेक आणि मी आता बाळाला जन्म देण्यासाठी तयार आहोत. काही वर्षांपूर्वी आमचं लक्ष पूर्णपणे आमच्या करियरवर होतं. आता कुटुंबाकडून देखील आमच्या दोघांवर दबाव आहे. लग्नाला 8 वर्ष झाली आहेत, आता बाळाचा विचार करा… असं कुटुंबाकडून सतत सांगण्यात येत आहे. माझी आई देखील सतत माझ्या बाळाबद्दल बोलत असते.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आता आम्ही दोघे देखील बाळासाठी तयार आहोत. तापर्यंत कामात व्यस्त असल्यामुळे आम्ही बाळाचा विचार केला नव्हता. खरं सांगायचं झालं तर, विवेक देखील बाळासाठी तयार नव्हता. मी तर कधी विचार देखील केला नव्हता. कारण आई होणं फार मोठी जबाबदारी आाहे. आता मला असं वाटतं माझ्या आयुष्यातील फार मोठा टप्पा निघून गेला आहे.’

‘आता जे काही होईल देवाच्या कृपेने होईल. कारण माझी बायोलॉजिकल वेळ निघून गेली आहे. पण जेव्हा माझ्या डॉक्टरांना भेटते तेव्हा मला धीर मिळतो. बाळ होण्यासाठी आणखी मार्ग आहेत. आपण IVF ची मदत घेवू शकतो… एवढंच नाहीतर, एग्ज फ्रिजिंग देखील एक पर्याय आहे. पण त्यासाठी मानसिकदृष्टीने अधिक स्वतःला धिट करावं लागतं…’

‘मला लोक कायम विचारतात सरोगेसी का नाही करत? हा पूर्णपणे माझा आणि विवेकचा निर्णय आहे. आम्ही आता बेबी प्लान करत आहोत. बाकी सर्वकाही विज्ञानावर आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिव्यांका त्रिपाठी म्हणाली… दिव्यांका सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;