मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा; चिमुकल्यांनी पाण्याशिवाय खेळली धुळवड
उन्हाळा वाढत असल्याने मराठवाड्यासह राज्याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. अनेक जलसाठे अर्ध्यावर आले आहेत. होळी आणि धुळवडीचा सण म्हणजे काही प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतोच. मराठवाड्यात पाणी टंचाई असल्याने बीड जिल्ह्यात चिमुकल्यांनी धुळवडीला कोरडा रंग खेळत पाण्याचा अपव्यय टाळला आहे. यातून त्यांनी पाणी बचतीचा संदेश दिला आहे. पाणी टंचाईमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाल गोपालांनी कोरड्याच रंगाने धुळवड साजरी केली.
मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बोअरवेल व विहिरी आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी पैसे खर्च करून टँकर बोलवावे लागत आहेत. पुढील तीन महिने पाणी टंचाईचे संकट बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेवत चिमुकल्यांनी यंदा धुळवडीच्या दिवशी कोरडा रंग खेळतच धुळवड साजरी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List